संगीतमय श्री काशीखंड व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहचे आयोजन!
यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – यावल येथे श्री गंगेश्वर महादेव मंदिर गंगा नगर यावल या येथे 24 जानेवारी पासून सुरू असलेला सप्ताहात गेले पाच दिवसापासून पासून संगीतमय श्री काशीखंड व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह शनिवार पासून सुरुवात झाली यावर प्रथमच सुंदर कांड चे आयोजन करण्यात आले आहे.
संगीतमय श्री काशीखंड व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. या कथेची प्रवक्ते हरिभक्त परायण मनोज महाराज , दुसखेडा तालुका यावल, हे चे वाचन करत आहेत पाचव्या दिवशी गुरुवार रोजी शिवलीला अमृत मधील कथा वाचनाचा पाचवा दिवस असून या सप्ताहाचे मार्गदर्शक व, आधार स्तंभ, हरिभक्त परायण श्री श्री १००८ महामंडलेश्वर नंदजी सरस्वती हरिभक्त परायण सूर्यभान महाराज शेळगावकर लाभत आहे. या कालखंडात सकाळी सहा ते सात काकडा आरती सात ते आठ विष्णू सहस्रनाम व दुपारी एक ते पाच पर्यंत कथा वाचन व हरिपाठ पाच ते सात हरिपाठ व रात्री आठ ते दहा कीर्तन सर्व देत आहे. दररोज रात्री सात ते नऊ या वेळात आयोजित करण्यात आलेले असे या सप्ताह मध्ये कीर्तनकार महाराज शनिवार सुंदरकांड भुसावळ ,रविवार धनराज महाराज अंजाळे,सोमवार रोहिणीताई खानापूर,मंगळवार सुभाष महाराज जळगाव,बुधवार प्रीतम महाराज सांगावी,गुरुवार विजय महाराज टाकरखेडा,शुक्रवार सूर्यभान जी महाराज शेळगावकर, शनिवार स्नेहलताई सामनेर, गायनाचार्य कुशल महाराज आळंदी देवाची,पवन महाराज आळंदी देवाची,काकड आरती पहारेकरी शांताराम महाराज व विनोद महाराज मोहराळा, मृदुंगाचार्य चैतन्य महाराज आळंदी देवाची, बँजो तबलावादक हर्षल जी महाराज दोलारखेडा व अतुल महाराज टाकळी व रविवार मनोज महाराज दुसखेडा, ता.यावल यांचे काल्याचे किर्तन सायंकाळी तसेच दिंडी सोहळा दि.३१ रोजी तीन ते सहा होणार आहे व १ फेब्रुवारी रोजी तळी भरण्याचा कार्यक्रम व देवी सप्तशती पाठ व कुमकुमार्चन विधि. व त्यानंतर महाप्रसाद बारा ते तीन चे आयोजन करण्यात आले आहे परिसरातील भावी भक्त व मंडळातील कार्यकर्ते सप्ताह समितीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

