Thursday, January 29, 2026
Homeगुन्हागेल्या ४ - ५ दिवसांपासून चोरटे करताय बंद घरांना टार्गेट

गेल्या ४ – ५ दिवसांपासून चोरटे करताय बंद घरांना टार्गेट

गेल्या ४ – ५ दिवसांपासून चोरटे करताय बंद घरांना टार्गेट !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून चोरटे बंद घरांना टार्गेट करीत असल्याचे उघडकीस आले आहे. निमखेडी शिवारातील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी विकास लक्ष्मण पाटील (वय २६, रा. संत सावता नगर, चिताहरण मंदिर) यांच्या घरातून सोने चांदीचे दागिने असा एकूण ६० हजारांचा ऐवज चोरुन नेला.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दि. २५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील निमखेडी शिवारातील संत सावता नगरातील चिताहरण मंदिराजवळ विकास लक्ष्मण पाटील (वय ३६) हे वास्तव्यास होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दि. २५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विकास पाटील यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात ठेवलेले ४० हजार रुपये किंमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन टोंगल, अंगठी, मणी आणि २० हजार रुपये किंमतीचे दोन भारचे चांदीचे ग्लास आणि ९ भारच्या चांदीच्या साखळ्या आणि पाच भाराचे जोडवे असा एकूण ६० हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. २६ रोजी उघडकीस आल्यानंतर विकास पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना विजय निकम हे करीत आहे.

गेल्या आठवडभरापासून तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घरांमध्ये चोरी होत असल्याच्या घटना घडत आहे. याठिकाणाहून चोरटे रोकडसह सोने चांदीचे दागिने चोरुन नेत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढीव वस्त्यामध्ये चोरटे दिवसभर बंद घरांची रेकी करुन रात्रीच्या सुमारास चोरी करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. त्यामुळे वाढीव लोकवस्तीमध्ये पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या