Tuesday, February 10, 2026
Homeआंदोलनवाल्मिक चौक ते अप्सरा चौक सिमेंट काँक्रिटीकरण दुभाजका सह रस्त्याच्या कामात घोळ.

वाल्मिक चौक ते अप्सरा चौक सिमेंट काँक्रिटीकरण दुभाजका सह रस्त्याच्या कामात घोळ.

वाल्मिक चौक ते अप्सरा चौक सिमेंट काँक्रिटीकरण दुभाजका सह रस्त्याच्या कामात घोळ!

पत्रकार सरंक्षण संघटनेचे मिलिंद सोनवणे यांची तक्रार !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी -भुसावळ शहरातील वाल्मिक चौक ते अप्सरा चौक दरम्यान सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामात गंभीर त्रुटी व प्रशासकीय मान्यतेचा भंग असल्याचा आरोप करत सोनवणे यांची सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित काम प्रशासकीय मान्यतेनुसार व तांत्रिक निकषांनुसार न होता घाईघाईने व नियमबाह्य पद्धतीने केले जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या कारणाने पुन्हा हा रस्ता चर्चेत आला आहे .
सार्वजनिक बांधकाम मार्फत सदर रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात रस्त्याचे कामा मध्ये अनियमितता दिसून येत असल्याचे सोनवणे यांचे म्हणणे आहे. सुरक्षितता उपाययोजना अथवा तांत्रिक देखरेख नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग कडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई अथवा उत्तर देण्यात आलेले नाही, असा आरोप सोनवणे यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
सदर कामाची तातडीने तांत्रिक चौकशी, प्रशासकीय मान्यता तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, प्रशासकीय मान्यते नुसार रस्ता पूर्ण करावा अशी मागणी केली आहे. कायदेशीर मार्गाने आज दि. 10/02/2026 रोजी भुसावळ उपविभागीय कार्यालय सार्वजनिक बांधकाम भुसावळ येथे आमरण उपोषण सुरु केले आहे या पुढे कायदेशीर मार्गाने दोषीवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही उपोषण कर्ते यांनी दिला आहे .
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या