Monday, July 6, 2026
Homeगुन्हाभुसावळातील बालाजी हॉलमधून अडीच लाखांचे दागिने लंपास; गुन्हा दाखल!

भुसावळातील बालाजी हॉलमधून अडीच लाखांचे दागिने लंपास; गुन्हा दाखल!

भुसावळातील बालाजी हॉलमधून अडीच लाखांचे दागिने लंपास; गुन्हा दाखल!

Oplus_131072

<img class

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील बालाजी हॉल येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान अज्ञात चोरट्याने ५० वर्षीय महिलेची पर्स चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,उज्वल प्रबोध भावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. सोफ्यावर ठेवलेली ही पर्स चोरट्याने लंपास केली, ज्यामध्ये १ लाख ९२ हजार ४०० रुपये किमतीची सोन्याची पोत, सोन्याचे टॉप्स, अंगठी आणि रोख १० हजार रुपये असा एकूण २ लाख ४९ हजार १४० रुपयांचा ऐवज होता. बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक भारती काळे पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या