Monday, February 16, 2026
Homeगुन्हाशहरात  गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयिताला उस्मानिया पार्क परिसरातून अटक: एलसीबीची कारवाई

शहरात  गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयिताला उस्मानिया पार्क परिसरातून अटक: एलसीबीची कारवाई

 गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयिताला उस्मानिया पार्क परिसरातून अटक: एलसीबीची कारवाई!

जळगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  – जळगाव शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने विनापरवाना अवैधपणे गावठी पिस्तूल बाळगणाया संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. उस्मानिया पार्क परिसारात मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूसं आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात एक तरुण बेकायदेशीररीत्या शस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. संशयित आरोपी मोहम्मद साद अय्युब खान (वय २१, रा. शाहू नगर, जळगाव) हा उस्मानिया पार्क परिसरातील अमिना बंगल्याच्या गल्लीत दिसून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक सिल्व्हर रंगाचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ३ जिवंत काडतूसं मिळून आली.
या कारवाईत पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, ६ हजार रुपये किमतीची ३ जिवंत काडतूसं आणि ८० हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची बजाज पल्सर दुचाकी असा एकूण १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक राजाराम किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या