Friday, November 20, 2026
Homeगुन्हादुचाकी चोरट्यांना पोलिसांचा दणका! दोघांना अटक; पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत

दुचाकी चोरट्यांना पोलिसांचा दणका! दोघांना अटक; पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत

दुचाकी चोरट्यांना पोलिसांचा दणका! दोघांना अटक; पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क -;शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी करून त्यांची कमी किमतीत विक्री करणाऱ्या दोघांना रामानंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. निर्मल राजेंद्र ठाकूर (रा. कांचननगर) आणि मनोज मोहन रंधे (रा. नशिराबाद, ता. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.पिंप्राळा परिसरातील रथ चौकातून बापू दत्तू कोळी यांची एमएच १९ बीई ८१६१ क्रमांकाची दुचाकी घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या.
त्यानुसार उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी जितेंद्र राजपूत, योगेश बारी, मनोज मराठे, सुमेध इंधाटे, मुकुंद गवते आणि सागर नन्नवरे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही चोरी निर्मल ठाकूर याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी कांचननगर परिसरातून त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने साथीदार मनोज रंधे याच्या मदतीने इतर ठिकाणांहूनही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.पोलिसांनी दोघांकडून अधिक चौकशी केली असता जळगाव शहरातील पिंप्राळा, इच्छादेवी तसेच चोपडा शहरातून चोरी केलेल्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यास पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या