बेशिस्त वाहतूक व वाहतूक नियमाचे उल्लघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल – सपोनि उमेश महाले !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील शाळा महाविद्यालयाच्या परिसरात बेशिस्त वाहतूक करणारे तसेच रस्त्यांमध्ये वाहन उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे नव्याने रुजू झालेले भुसावळ शहर वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले यांनी आज १४ रोजी शहर वाहतुक शाखेच्या कार्यालयात पञकारांशी संवाद साधताना सागितले. तसेच जे बुलेट चालक रस्यांवर नाहक कर्कश आवाज करुन फटाके फोडण्याचा आवाज करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे बुलेटचे सायलेन्सर जागेवरच काढून घेण्यात येईल आणि त्यांच्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. कोणाचीही हायगय केली जाणार नाही असे देखील महाले यांनी म्हटले आहे. येणाऱ्या आगामी सण उत्सवात तसेच निवडणूक काळात वाहन चालकांनी वाहतूक नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. ट्रिपल सिट, वाहतूक नियमाचे उल्लघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जर कोणी बुलेट चालक रस्यांवर कर्कश आवाज करुन फटाके फोडण्याचा आवाज करीत असेल तर नागरीकांनी अशा वाहनाचा फोटो काढून किंवा माझ्या भ्रमणध्वनी वर संर्पक करावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले यांनी सांगितले आहे.