महिला महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक
कार्यक्रम संपन्न
जळगाव : खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 चे वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्री. अे.पी. चौधरी तर उद्घाटक म्हणून जळगाव शहर महापालिकेच्या महापौर सौ. दिपमाला काळे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींनी विविध कौशल्य विकसित करून व्यक्तिमत्व विकासात वाढ करावी, असे आव्हान केले.यानंतर प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी विविध विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. आपल्या अध्यक्षीय


भाषणात श्री अे पी. चौधरी “विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्यातील सुप्त गुणांचा विकास करावा” असे म्हटले.
दुपारच्या सांस्कृतिक कार्यक्रमात कु . अलिफा हिने मराठी नृत्य, कु. लक्ष्मी तागवाले हिने गणेश वंदना, कु. निशा पाटील आणि कु. सुवर्णा इंगळे यांनी कोळी नृत्य तसेच कु. ममता वाघ हिने अप्सरा आली या गाण्यावर नृत्य केले . तसेच इतर विद्यार्थिनींनी समूह नृत्य, समूह गायन, बॉलीवूड रिमिक्स सादर केली. या प्रसंगी परीक्षक म्हणून प्रा. वंदना पाटील व प्रा. मिनाक्षी वाघमारे यांनी काम पाहिले. यावेळी मंचावर प्रा. श्री अे.पी. चौधरी, सौ. अर्चना चौधरी,
महापौर दिपमाला काळे, प्राचार्या जयश्री नेमाडे व उपप्राचार्य डॉ. सतीश जाधव, कु. निशा पाटील उपस्थित होते . सदरील कार्यक्रमासाठी विद्यार्थीनी, पालक, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश कांबळे तर आभार प्रा. माधव पाटील यांनी मानले विद्यार्थ्याच्या पालकांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला व उत्साह वाढविला .

