भोळे महाविद्यालयात महिला आरोग्य संवर्धन अभियानांतर्गत व्याख्यान

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय येथे ‘महिला आरोग्य संवर्धन ऋतीमती अभियान’ अंतर्गत महिलांचे विविध आजार व उपाययोजना या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
डॉ. माया अर्वीकर यांनी मासिक पाळीदरम्यान येणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्यांवर मार्गदर्शन करत स्वच्छता, संतुलित आहार, नियमित व्यायाम व आरोग्याची काळजी याबाबत पॉवरपॉइंटद्वारे माहिती दिली. विद्यार्थिनींच्या प्रश्नांचे त्यांनी समाधानकारक निरसन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. पी. फालक होते. प्रा. डॉ. अंजली पाटील, प्रा. डॉ. संजय चौधरी आदी उपस्थित होते. प्राचार्यांनी महिलांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य सुदृढ असेल तर कुटुंब व समाज निरोगी राहतो, असे सांगितले.
सूत्रसंचालन डॉ. माधुरी पाटील यांनी केले, तर आभार प्रा. संगीता धर्माधिकारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

