भुसावळ तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानास प्रारंभ
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि 25
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार भुसावळ तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान टप्पा 1 राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत दि. 7 मार्च 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ तसेच नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर एक दिवसीय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार भुसावळ श्रीमती निता लबडे यांनी दिली.
या अभियानाची पूर्वतयारी दि. 18 फेब्रुवारी 2026 ते 5 मार्च 2026 दरम्यान करण्यात येत असून, शिबिरांमधून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांना महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शिबिरांतर्गत उपलब्ध सेवा पुढीलप्रमाणे –
प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा
अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क सेवा
लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन-क्रिमीलेअर आदी प्रमाणपत्रे अकृषक तरतुदींसंदर्भातील मार्गदर्शन संपुष्टात आलेल्या सनद प्रणाली (कलम 42 अ, ब, क, ड) बाबत कार्यवाही
एक वेळचे अधिमूल्य भरण्याची नवीन व्यवस्था डिजिटल 7/12 च्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करणे एक खिडकी योजनेअंतर्गत ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान सेवा
‘माझा 7/12 – अचूक 7/12’ विशेष मोहीम राबवून 7/12 वरील पोकळ शेरे, कालबाह्य नोंदी व लेखन प्रमाद (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155) दुरुस्ती
मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
शनिवार, दि. 7 मार्च 2026 – वरणगाव मंडळ
शनिवार, दि. 14 मार्च 2026 – कुन्हे प्र.न. भागशुक्रवार, दि. 10 एप्रिल 2026 – पिंपळगाव बु./खु. भागशुक्रवार, दि. 17 एप्रिल 2026 – खडके भाग शुक्रवार, दि. 8 मे 2026 – भुसावळ मंडळ प्रत्येक मंडळासाठी नोडल अधिकारी व संबंधित ग्राम महसूल अधिकारी/महसूल सेवकांची नियुक्ती करण्यात आली असून, नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.
तरी, भुसावळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार श्रीमती निता लबडे यांनी केले आहे.

