विद्यार्थ्यांचे एन.एम.एम.एस. परीक्षेत उज्ज्वल यश
I मुक्ताईनगर : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचा आणि गावाचा मान उंचावला आहे. या परीक्षेत मनीष चव्हाण याने ८० टक्के गुण मिळविले, तर भावेश चव्हाण याने ८६ टक्के गुणांसह विशेष प्रावीण्य मिळविले. तेजस्विनी झांबरे हिने ७५ टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. या यशामागे मुख्याध्यापक मोहन पाटील यांचे नेतृत्व तसेच शिक्षिका रिना मॅडम, कळसकर सर, अश्विनी मॅडम, संजय सर, नाईक सर, रेखा मॅडम, रूळे मॅडम, लाजुलकर सर, तायडे सर आणि संदीप सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल चव्हाण, पत्रकार प्रकाश पवार, टाकळीचे सरपंच राजू चव्हाण तसेच ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.

