Friday, February 27, 2026
Homeजळगावविद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा

विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा

विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा
भुसावळ –  खानदेश ला इंग्लिश प्रतिनिधी              तालुक्यातील किन्ही येथील समाजिक कार्यकर्ते तथा राम मंदिराचे जनक, व शालेय शिक्षण समिती माजी अध्यक्ष कांतीभाई सुरेश येवले यांनी आपला वाढदिवस मोठा गाजावाजा न करता व केक, पुष्पाहार व इतर खर्च न करता. जिल्हा परिषदेच्या शाळेत १०० विद्यार्थाना वही, पेन, पेन्शील, खोडरबर, शॉपणर, देऊन मोठ्या उत्सहात विद्यार्थी सोबत साजरा केला. यावेळी व्यासपीठावर पत्रकार तथा आरोग्यदूत हर्षल पाटील यांच्या हस्ते विद्यार्थाना हे वाटप शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कांतीभाई यांच्या ह्या सामाजिक उपक्रमामुळे एक नवीनच आदर्श समाजा समोर निर्माण झाला आहे. यावेळी मुख्याध्यापिका सुनीता डोळे, शिक्षण ओंकार पाटील, राजेश सुरवाडे, शिक्षिका दीपाली पाटील, माजी सरपंच सुरेश येवले, जीवन येवले (सर) जयेश येवले, युवराज येवले, प्रिती येवले, चारू येवले उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या