Saturday, March 7, 2026
Homeजळगावभुसावळात महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

भुसावळात महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

भुसावळात महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
ंउपविभागीय पोलीस कार्यालयात विशेष कार्यक्रम; केदार बारबोले यांच्या हस्ते सत्कार

भुसावळ     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             दि 7
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भुसावळ उपविभागीय पोलीस कार्यालयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत महिलांच्या कामगिरीचा गौरव यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन भुसावळ उपविभागीय पोलीस कार्यालयात करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या हस्ते महिला पोलीस, महिला पोलीस पाटील, महिला वकील तसेच विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महिलांनी समाजाच्या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच उपस्थित महिलांनी आपल्या कार्यातील अनुभवही मांडले.
कार्यक्रमाला महिला पोलीस कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या