Saturday, March 7, 2026
Homeजळगावजागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यान संपन्न !

जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यान संपन्न !

जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यान संपन्न .

जळगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  – अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालयात एन.एस.एस, स्त्री अभ्यास केंद्र व समाजशास्त्र विभागातर्फे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मा.कावेरी कमलाकर पोलीस निरीक्षण शनिपेठ, जळगाव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले . त्यांनी विद्यार्थिनींना ‘ डिजिटल युगात महिलांची सुरक्षितता’ या विषयावर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी जीवनात आपली ध्येय निश्चित करा,भविष्यात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करा व मोबाईलचा कामापुरताच वापर करा तसेच मोबाईल जसा मित्र आहे तसा शत्रु सुद्धा आहे . असे सांगितले.

Oplus_131072

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जयश्री नेमाडे यांनी भूषविले.अधिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवण्यात.सर्व विद्यार्थ्यांना महिला आयोगाची माहिती असावी असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डिंपल पाटील यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. साधना जावळे व डॉ. किशोर नेहेते यांनी सहकार्य केले अशी माहिती कॉलेज च्या प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे यांनी दिली आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या