Saturday, March 7, 2026
Homeजळगावमाऊली प्लाझा इमारतिच्या लांबी, रुंदी,उंचीत वाढ झाल्याचे पाहणीत झाले निष्पन्न.

माऊली प्लाझा इमारतिच्या लांबी, रुंदी,उंचीत वाढ झाल्याचे पाहणीत झाले निष्पन्न.

कारवाई काय होणार..? संपूर्ण भुसावळ जंक्शनचे लक्ष लागून.

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – शहरातील जामनेर रोड परिसरातील सर्वे क्र.115/1/अ, प्लॉट क्रमांक 09 वरील वादग्रस्त माऊली प्लाझा इमारतीच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. या इमारतीच्या लांबी रुंदी उंचीत वाढ झाल्याने तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत धक्कादायक बाबी उघड झाल्यानंतर अहवाल भुसावळ उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असल्याने पुढील कारवाईकडे संपूर्ण भुसावळ जंक्शन चे लक्ष लागून आहे.
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान मंजूर आराखड्यापेक्षा वेगळे व अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचे प्राथमिक निरीक्षणात समोर आले आहे. विशेषतः बेसमेंटच्या लांबी-रुंदीमध्ये बदल, इमारतीच्या उंचीत वाढ तसेच इमारतीच्या विविध बाजूंनी करण्यात आलेले एक्स्टेंशन हे मंजूर नकाश्यापेक्षा वेगळे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे बांधकाम नियमांचे उल्लंघन झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच इमारतीच्या परिसरालगत उच्च दाबाची विद्युत वाहिनी (High Tension Line) जात असल्याची बाबही अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा अत्यंत गंभीर मानला जात असून भविष्यात संभाव्य धोका निर्माण होऊ नोंद करण्यात आली आहे. याशिवाय मंजूर आराखड्यातील लिफ्ट डक्ट, पार्किंग व्यवस्थासंभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशीही नोंद करण्यात आली आहे. याशिवाय मंजूर आराखड्यातील लिफ्ट डक्ट, पार्किंग व्यवस्था तसेच इतर तांत्रिक बाबींमध्ये प्रत्यक्ष स्थिती वेगळी असल्याचेही संयुक्त पाहणीत स्पष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वीच लेखी तक्रारी केल्या होत्या. पाहणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्यानंतर आता या वादग्रस्त बांधकामावर प्रशासन कोणती कठोर कारवाई करणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. तसेच भुसावळातील इतर अनधिकृत बांधकामांवरही प्रशासन कारवाई करणार का, असा सवालही नागरिकांकडून केली जात आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या