Wednesday, May 6, 2026
Homeजळगावनाहाटा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाची औद्योगिक सहल संपन्न

नाहाटा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाची औद्योगिक सहल संपन्न

नाहाटा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाची औद्योगिक सहल संपन्न
भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           दि 7
येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक सहल आज दि. ०६ मार्च २०२६ रोजी पार पडली. यात सुरुवातीला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. डी.एन.पाटील यांनी नारळ फोडून सहलीला हिरवा झेंडा दिला. त्यानंतर उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी यांनी सहलीसाठी शुभेच्छा दिल्या. सुरुवातीस अर्थशास्त्राचे विद्यार्थी व प्राध्यापक यांनी किन्ही एम. आय. डी. सी. तील’ लक्ष्मी पेपर अँड प्रॉडक्ट ‘ या पेपर निर्माण करणाऱ्या प्रकल्पास भेट दिली.. त्यानंतर मिलचे संचालक जितेंद्र सरोदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ” सूपार्श्व फुड मिल’ या दाल मिल प्रकल्पास भेट देण्यात आली. यात चणाडाळ, तूर डाळ, मूग डाळ यांची निर्माण प्रक्रिया कशी असते याची सखोल मार्गदर्शन जितेंद्र पाटील यांनी केले. यावेळी दाल मिल चे संचालक योगेश प्रितेश कोटेचा यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना मिळालेले ज्ञान उद्योजक बनत असताना कसे कामी येते व विद्यार्थ्यांनी उद्योजक बनण्यासाठी काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले.
पुढील टप्प्यात विद्यार्थी व प्राध्यापक यांनी हरताळा येथील ‘ *भारत कृषी उद्योग* ‘ या प्रकल्पास भेट देऊन तेथील माहिती गोळा केली. भारत ऍग्रो येथे तरुण उद्योजक मा. श्री. सनी बढे यांनी विद्यार्थ्यांना केळीची रोपे, भाजीपाल्याची रोपे कसे तयार केली जातात व त्यांची संगोपन कसे केले जाते तसेच त्याच्या विक्रीशी संबंधित व येणाऱ्या अडचणींविषयी ऊहापोह केला. त्यानंतर भारत ऍग्रो चे संचालक मा. श्री. निलेश बढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरास भेट दिली त्यानंतर सहलीच्या शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी चांगदेव महाराज मंदिर तसेच मेहुण येथील संत मुक्ताई मंदिरास भेट देऊन तेथील पर्यटन व व्यवस्थापनाची माहिती घेतली आणि पर्यटनाचा आनंद घेतला. सहलीत अर्थशास्त्र विभागातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. टी . धुम, व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. किरण वारके, प्रा. विलास सोळुंके, प्रा. डॉ. जितेंद्र आडोकार, प्रा. सुनिल अडकमोल, प्रा. जोगेश्वरी पाटील, प्रा. प्रिया लोहार तसेच अर्थशास्त्र विषयाचे एस. वाय., टी. वाय., एम. ए. भाग १ व २ चे निवडक विद्यार्थी उपस्थित होते. सहल यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. ब-हाटे, उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. आर वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक व नियोजन मंडळातील सदस्य यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या