Tuesday, April 21, 2026
Homeजळगावभुसावळ तालुक्यातील गोंभी गावातील खदान ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांना त्रास; तहसीलदारांकडून खदानच्या संचालकाला नोटीस

भुसावळ तालुक्यातील गोंभी गावातील खदान ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांना त्रास; तहसीलदारांकडून खदानच्या संचालकाला नोटीस

भुसावळ तालुक्यातील गोंभी गावातील खदान ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांना त्रास; तहसीलदारांकडून खदानच्या संचालकाला नोटीस

भुसावळ     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  दि 5
तालुक्यातील मौजे गोंभी (गट क्रमांक ९/१ आणि ९/२) येथील दगडखदानमध्ये होत असलेल्या मोठमोठ्या ब्लास्टिंगमुळे (स्फोट) ग्रामस्थांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे. त्या अनुषंगाने भुसावळ तहसीलदार निता लबडे यांनी खदानीचे संचालक श्री. आशिष किशोर अग्रवाल (राहणार भुसावळ) यांना नोटीस बजावली आहे.
नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, खदानमध्ये नियमितपणे होणाऱ्या मोठ्या स्फोटांमुळे निर्माण होणारा प्रचंड आवाज, धक्के आणि वाहनांच्या धुळीमुळे गोंभी गावातील ग्रामस्थांना सतत त्रास होत आहे. अबालवृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असून, ग्रामस्थ भयभीत वातावरणात जीवन जगत आहेत. गावात शाळा असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि आरोग्यावरही मोठा परिणाम होत आहे. तसेच, या स्फोटांमुळे पर्यावरणाचीही हानी होत असल्याचे नमूद केले आहे. तहसीलदारांनी नोटीसमध्ये खदानी संचालकांना या सर्व तक्रारींची चौकशी करण्याचे निर्देश दिले असून, सदर खदानमध्ये होत असलेल्या ब्लास्टिंगची पूर्ण तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही

 

Oplus_131072

करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केल्यानंतर प्रशासनाने त्वरित दखल घेतली असून, यापुढे अशा प्रकारच्या ब्लास्टिंगमुळे होणारा त्रास रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, स्फोटांचा आवाज आणि कंपनामुळे घरातील भांडी-कुंडी हलतात, मुलांना शाळेत लक्ष केंद्रित करता येत नाही. यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. प्रशासनाकडून होणारी कार्यवाही ग्रामस्थांसाठी दिलासादायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या