Sunday, June 7, 2026
Homeआंदोलनमोकाट गुरांचा बंदोबस्त न केल्यास शेतकरी बैलांचा मोर्चा काढणार...

मोकाट गुरांचा बंदोबस्त न केल्यास शेतकरी बैलांचा मोर्चा काढणार…

मोकाट गुरांचा बंदोबस्त न केल्यास शेतकरी बैलांचा मोर्चा काढणार…

यावल.   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                    दि.९   शहरातील व परिसरातील मोकाट फिरणारे गुरे आणि सांड यांचा बंदोबस्त ८ दिवसात न झाल्यास शहरातील शेतकरी नगरपालिकेवर बैलांचा मोर्चा काढणार असल्याचे लेखी निवेदन यावल तहसीलदार,
नगरपरिषद मुख्याधिकारी,आणि पोलीस निरीक्षक यावल यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की यावल शहरात मोकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे, मोकाट गुरांमध्ये सांड सुद्धा आहेत रस्त्याने बैलगाडी,मोटरसायकलने जाणाऱ्या- येणाऱ्यांच्या अंगावर हे सांड मागे सुटतात व बैलगाडीला बांधलेल्या बैलांना मारतात जखमी करतात सदरचे सांड हे बैलगाडीला धडक देऊन माणसांना सुद्धा जखमी करून आजूबाजूने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर सुद्धा धावून जातात,मागे यावल शहरात एका सांडमुळे एक व्यक्ती दगावला आहे,मोकाट सांडमुळे नागरिकांना इजा होण्याची दाट संभावना व्यक्त करण्यात येत आहे तरी यावल नगर परिषदेने ८ दिवसात शहरातील मोकाट गुरांचा आणि मोकाट सांडाचा बंदोबस्त न केल्यास यावल शहरातील शेतकरी यावल नगरपालिकेवर बैलांचा मोर्चा काढणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर
निलेश गडे,समाधान वाघ, गणेश सुरळकर,युवराज कोळी,दिपक वाघ,हर्षल कोळी, समीर खान, अयाज खान,मनोज पाटील, बापू कोलते व गावातील शेतकऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या