Friday, March 13, 2026
Homeचाळीसगावगॅस दरवाढीविरोधात काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले

गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले

गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले

चाळीसगाव :  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात केंद्र सरकारने केलेल्या वाढीविरोधात चाळीसगाव तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत निषेध नोंदविण्यात आला.निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात अचानक ६० रुपयांची वाढ करून सर्वसामान्य जनतेवर आर्थिक भार टाकला आहे. केंद्रात सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने अनेक वेळा गॅस दरवाढ केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.काँग्रेसच्या काळात सुमारे ४०० रुपयांच्या आसपास असलेला गॅस सिलेंडरचा दर आता ९०० रुपयांच्या पुढे गेला असून त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. तसेच हॉटेलमधील जेवणाचे दर आणि बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेसचा खर्चही वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. वाढती महागाई लक्षात घेता केंद्र सरकारने गॅसचे वाढवलेले दर तात्काळ कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल निकम, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र जाधव, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, प्रदेश प्रतिनिधी रमेश शिंपी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता गौरव चौधरी, शहर उपाध्यक्ष मंगेश अग्रवाल, नितीन सूर्यवंशी, सुधाकर कुमावत, नितीन परदेशी, देवेंद्रसिंग पाटील, अमजद खान, सागर नागणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या