Sunday, March 15, 2026
Homeगुन्हावडीलांना मारहाण केल्याच्या रागातून तिघांवर भरचौकात गोळीबार !

वडीलांना मारहाण केल्याच्या रागातून तिघांवर भरचौकात गोळीबार !

वडीलांना मारहाण केल्याच्या रागातून तिघांवर भरचौकात गोळीबार !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – वडीलांना मारहाण केल्याच्या रागातून चौकात बसलेल्या तिघांवर दोन राऊंड फायर केल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वाल्मिक नगरातील घरकुल चौकात घडली होती. या घटनेनंतर संशयित हा पळून गेला होता. शनिपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपासचक्रे फिरवित संशयित अनिल रसाल राठोड (रा. श्रीराम चौक) याला अटक केली असून तो सद्या पोलीस कोठडीत आहे.

शहरातील वाल्मिक नगरातील श्रीराम चौकात राहणारे रसाल राठोड (वय ४८) हे नेरीनाका स्मशानभूमीकडून जात असतांना दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघांनी त्यांना मारहाण केली. वडीलांना मारहाण झाल्यामुळे संतापाच्या भरात घरातून निघालेल्या अनिल राठोड याला मारहाण करणारे तिघे वाल्मिक नगरातील घरकुल चौकात बसलेले दिसले. राठोड हा दुचाकी वळवून त्यांच्याकडे आला आणि कमरेला लावलेल्या गावठी कट्टूयातून मारहाण करणाऱ्यांच्या दिशेने दोन राऊंड झाल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी लागलीच पोहेकॉ योगेश जाधव, अमोल वंजारी, पराग दुसाने, निलेश घुगे, नवजीत चौधरी यांचे पथक रवाना केले. या पथकाने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित अनिल राठोड याला अटक केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या