Friday, March 20, 2026
Homeचाळीसगावशहरात  ३७.७५ लाखांचा सुंगधित गुटखा मुद्द जप्त

शहरात  ३७.७५ लाखांचा सुंगधित गुटखा मुद्द जप्त

शहरात  ३७.७५ लाखांचा सुंगधित गुटखा मुद्द जप्त

चाळीसगाव : खान्देश लाईव्ह न्युज . येथील शहर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकासोबत १८ रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास ओझर गावाजवळ संयुक्त कारवाई करत सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला असून, एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ३७ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या प्रकरणात आरोपी शेहजाद अहमद याकूब मोहम्मद (रा. ए वन पॅलेस सोसायटी, नवसारी, गुजरात) यास ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईदरम्यान सुमारे ९६ गोण्या विमल व इतर सुगंधित तंबाखूचा साठा तसेच अंदाजे १२ लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले.
ही कारवाई चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप घुले, योगेश मांडोळे, विकास पाटील, दत्तू सावळे, ज्ञानेश्वर पाटोळे, विलास पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तसेच अन्न व औषध प्रशासन जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोराडे (फिर्यादी), किशोर आत्माराम साळुंखे तसेच वाहन चालक वृषभ संजय चव्हाण यांचा सहभाग होता.या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय संदीप घुले करीत आहेत . कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संदीप घुले यांनी कारवाई केली .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या