Wednesday, October 21, 2026
Homeगुन्हा१.२३ कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित रेल्वेतून अटकेत !

१.२३ कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित रेल्वेतून अटकेत !

१.२३ कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित रेल्वेतून अटकेत !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी हर्बल लाइफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित दीपेश कमलेश रुपानी याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा रेल्वे स्थानकावर अटक केली. मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना त्याला पकडण्यात आले.

या प्रकरणातील संशयित दीपेश रुपानी हा गेल्या वर्षभरापासून फरार होता. आर्थिक गुन्हे शाखेकडून राजस्थान, जोधपूर, अमरावती, खामगाव आणि बडनेरा परिसरात त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, तो वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. तसेच दुसऱ्या व्यक्तींच्या नावाने सिमकार्ड आणि मोबाईल क्रमांक वापरून तो पोलिसांना गुंगारा देत असल्याची माहिती आहे.संशयिताने टक्कल करून पेहरावात बदल केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याच्या वेगवेगळ्या पेहरावांतील संभाव्य छायाचित्रांच्या आधारे शोध सुरू ठेवला.दरम्यान, दीपेश रुपानी हा दुरंतो एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील, उपनिरीक्षक विजय निकुंभ आणि अन्य कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले.

भुसावळ स्थानकावर गाडीला पाच मिनिटांचा थांबा असल्याने पोलिसांनी डब्यांमध्ये संशयिताचा शोध घेतला; मात्र तो आढळला नाही. पुढे बडनेरा स्थानकावर गाडीचा वेग कमी होताच संशयिताने गाडीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.या प्रकरणात दीपेश रुपानी याच्यासह आकाश सुरजमलजी सिद्ध ऊर्फ आकाश वर्मा याचाही उल्लेख आहे. या गुंतवणूक प्रकरणात अन्य कोणी फसवणुकीला बळी पडले असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या