Wednesday, October 21, 2026
Homeगुन्हाजुन्या बसस्थानक परिसरात मध्यरात्री गोळीबार !

जुन्या बसस्थानक परिसरात मध्यरात्री गोळीबार !

जुन्या बसस्थानक परिसरात मध्यरात्री गोळीबार !

प्रेमसंबंधाच्या वादातून गोळीबार झाल्याचा संशय; दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार

जळगाव     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      जळगाव शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत ३५ वर्षीय महिला जखमी झाली असून, तिच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिलेचे रोहन मधुकर सपकाळे (वय ३०) या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. या संबंधांना रोहनचा भाऊ अनिकेत याचा विरोध असल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास महिला आणि रोहन हे दुचाकीवरून जुन्या बसस्थानक परिसरातून जात असताना अनिकेतने त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. यानंतर दोघांच्या दिशेने गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत महिलेच्या डाव्या पायाला गोळी लागल्याने ती जखमी झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही संशयित आरोपी फरार असल्याची माहिती आहे.

गोळीबारामागील नेमके कारण, घटनेतील संबंधितांची भूमिका आणि फरार संशयितांचा शोध याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शहरातील मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या