Wednesday, October 21, 2026
Homeजळगावभारतीय सायन्स टेक्नो फेस्टिव्हलमध्ये भुसावळ तालुक्यातील दोन संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार

भारतीय सायन्स टेक्नो फेस्टिव्हलमध्ये भुसावळ तालुक्यातील दोन संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार

भारतीय सायन्स टेक्नो फेस्टिव्हलमध्ये भुसावळ तालुक्यातील दोन संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार

महात्मा गांधी विद्यालय व कलाम देवगिरी चिल्ड्रन सायंटिस्ट सेंटरचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणार, वरणगाव :  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथे श्रीमती पी. डी. श्रॉफ संस्कार दीप विद्यालयात सहाव्या भारतीय सायन्स टेक्नो फेस्टिव्हल २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान महोत्सवात भुसावळ तालुक्यातील दोन संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून, वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि भुसावळ येथील कलाम देवगिरी चिल्ड्रन सायंटिस्ट सेंटरचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

२४ व २५ ऑक्टोबरला विज्ञानाचा जागर

‘विज्ञान समाजासाठी : नावीन्य, प्रेरणा आणि परिणाम’ या संकल्पनेवर आधारित हा दोन दिवसीय महोत्सव २४ व २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडणार आहे. या महोत्सवात विज्ञान प्रश्नमंजुषा, वैज्ञानिक व्यक्तिरेखा सादरीकरण (सायंटिफिक कॅरेक्टर रोल प्ले), नावीन्यपूर्ण विज्ञान प्रतिकृती सादरीकरण, लाईन फॉलोइंग रोबोट स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिक्षकांसाठी ‘फ्युचर क्लासरूम चॅलेंजेस २०२६’ अंतर्गत पीपीटी सादरीकरणाची स्पर्धाही होणार आहे. देशातील विविध क्षेत्रांतील वैज्ञानिकांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील नव्या संकल्पना, संशोधन आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

महात्मा गांधी विद्यालयाचे सात विद्यार्थी सहभागी

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शिक्षक सुनील वानखेडे व निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहिल झोपे, सार्थक माळी, हेम बढे, रोनित राणे, वरद पाटील, वीर पाटील आणि सोहम पाटील हे सात विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

कलाम देवगिरी सेंटरचे सहा विद्यार्थी सहभागी

भुसावळ येथील कलाम देवगिरी चिल्ड्रन सायंटिस्ट सेंटरच्या अ‍ॅड. जयश्री राय व डॉ. तेजल राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षरा राय, पूर्वा धांडे, पूर्वेश धांडे, गगना कोळी, निधी बऱ्हाटे आणि स्वरा राणे हे सहा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील या विज्ञान महोत्सवात आपले कौशल्य सादर करणार आहेत.

भुसावळ तालुक्यातील या दोन्ही संघांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर आपली वैज्ञानिक प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या सहभागाकडे शैक्षणिक व विज्ञान क्षेत्राचे लक्ष लागले आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या