मुंबई बॉम्बने उडवून देण्याची धमकी..
मुंबई/. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी :- मुंबईतील आझाद मैदान येथील मुंबई प्रेस क्लबला ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना आज, २० मार्च २०२६ रोजी समोर आली आहे.
धमकीचा ईमेल प्राप्त होताच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई प्रेस क्लबची इमारत रिकामी करण्यात आली. मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोध व नाशक पथकाने संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली.
स्थानिक पोलीस आणि सायबर सेल या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ज्या आयडीवरून हा ईमेल आला, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
प्राथमिक तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पोलीस सर्व बाबींची पडताळणी करत आहेत.


