Friday, March 20, 2026
Homeजळगावबोराडी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही.पाटील यांचे पुस्तक प्रकाशित; औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात...

बोराडी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही.पाटील यांचे पुस्तक प्रकाशित; औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात मोठी कामगिरी

बोराडी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही.पाटील यांचे पुस्तक प्रकाशित; औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात मोठी कामगिरी
शिरपूर /.   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी :      प्रसारक संस्था संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, बोराडी ता. शिरपूर, जि. धुळे या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील यांनी औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत Brilliants Publication चे “Pharmaceutical Organic Chemistry” या विषयावरील पुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया,नवी दिल्ली यांच्या अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष बी. फार्मसीच्या द्वितीयर सत्रातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे फार्मसी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

 


डॉ. विकास पाटील यांनी संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नावावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये एकूण ४२ संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी २९ राष्ट्रीय तर १३ आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी ५ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या संशोधन लेखांना ७५१ संशोधन लेखांमध्ये उद्धृत (Citation) करण्यात आले आहे.

त्यांचा संचयी इम्पॅक्ट फॅक्टर (IF) 10, एच-इंडेक्स 19 आणि I-10 इंडेक्स 29 इतका आहे. संशोधन क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. तसेच त्यांच्या नावावर ४ भारतीय पेटंट आणि १ यूके डिझाईन ग्रँटेड पेटंट देखील आहे.

डॉ. पाटील हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे संशोधन कार्यासाठी ३० पी.जी. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक तसेच ४ पीएच.डी. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे फार्मास्युटिकल केमिस्ट्री विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणूनही काम पाहत आहेत.
सध्या ते Science Alert International Journals या पाच आंतरराष्ट्रीय जर्नल्सचे तांत्रिक संपादक म्हणून कार्यरत आहेत. Red Flower Publication, नवी दिल्लीकडून प्रकाशित होणाऱ्या JPMC या राष्ट्रीय जर्नलच्या राष्ट्रीय सल्लागार संपादकीय मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये अनेक संशोधन लेखांचे पुनरावलोकन केले आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ४० संशोधन पत्रे सादर केली आहेत.

 


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, औषधनिर्माणशास्त्र विभागाचे माजी. अधिष्ठाता डॉ.व्ही. आर. पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस.राजपूत तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, औषधनिर्माणशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. डी. ब-हाटे व कॉलेज ऑफ फार्मसी फैजपूरचे प्राचार्य डॉ.आर. वाय. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच डॉ. विकास व्ही. पाटील हे सेवानिवृत्त जि.प. शिक्षक वसंत पुरुषोत्तम पाटील व सेवानिवृत्त जि. प. मुख्यध्यापिका सौ. हिराबाई वसंत पाटील यांचे सुपुत्र आहेत. तरी त्याच्या यशाबदल जळगांव जिल्यातील सावदा या ग्रामीण भागातून सर्वत्र शुभेच्छा देण्यात येत आहेत.
त्यांच्या या पुस्तक प्रकाशनाच्या यशाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आणि धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे,बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, नगरसेवक रोहित रंधे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार एस. वाघ, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या