Friday, March 20, 2026
Homeजळगावशिंदी स्मशानभूमीत लेव्हलिंगचे काम सुरू; दीर्घकाळ सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड लवकरच

शिंदी स्मशानभूमीत लेव्हलिंगचे काम सुरू; दीर्घकाळ सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड लवकरच

शिंदी स्मशानभूमीत लेव्हलिंगचे काम सुरू; दीर्घकाळ सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड लवकरच

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              16
इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतो, हे शिंदी येथील स्मशानभूमीच्या विकासाच्या कामातून दिसून येत आहे. ओसाड दगडी परिसरात असलेल्या या स्मशानभूमीचा सामाजिक कार्यकर्ते किरण दादा जाधव यांच्या प्रयत्नांमुळे विकास सुरु आहे.
काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणाहून निघणारे दगड, माती आणि रॅबिट स्मशानभूमीत आणले गेले होते. आता जेसीबीच्या मदतीने त्या परिसराची जागा समतल (लेव्हलिंग) करण्याचे काम हाती घेतले आहे.
किरण दादा जाधव यांनी सांगितले की, येत्या पावसाळ्यात या ठिकाणी दीर्घकाळ सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड केली जाईल, ज्यामुळे परिसर अधिक सुंदर आणि पर्यावरणपूरक बनेल.
महागाईच्या काळातही स्थानिक लोकांकडून वाहने आणि जेसीबी उपलब्ध करून, आव्हानात्मक काम करणे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे. या उपक्रमामुळे शिंदी ग्रामस्थांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणप्रती जागरूकता वाढल्याचेही दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या