साकेगाव विकासो व जेडीसीसी बॅकेकडे कर्ज वाटपची यादीच नाही – शेतकरी अशोक कुरकुरे यांची तक्रार

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील साकेगाव येथील विविध कार्यकारी सोसायटी व जळगाव जिल्हा सहकारी बँके कडे कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांची यादी नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याबाबतची माहीती साकेगाव येथील शेतकरी अशोक रंगन्नाथ कुरकुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे . माहीती अधिकार अर्जानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे .
कुरकुरे यांनी म्हटले आहे कि मागील वर्षभरापासून साकेगाव वि .का . सो तील बोगस बागायत कर्ज वाटपाबाबत तक्रार अर्ज तसेच माहिती अधिकार चे अर्ज देत आहेत . याबाबत जेडी सीसी बॅक क्षेत्रीय कार्यालय भुसावळ यांनी सुद्धा आमच्या कडे कर्जदार माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले पुढे जळगाव जिल्हा बँकेत अपिल केल्यावर सुद्धा तेच उत्तर मिळाले जी बॅक कर्ज वाटप करते त्याच्याकडे माहिती कशी नाही हे सगळ त्याच्या कर्ज वाटप सेवानिवृत झालेले व पुन्हा कामावर ठेवलेले अधिकारी कचरे यांच्या दबावामुळे माहीत दिली जात नाही असे शेतकऱ्या चे म्हणणे आहे . बँकेकडे वेळोवेळी तक्रार अर्ज दिलेले आहे तसेच स्मरण पत्रे दिलेली आहे याबाबत साकेगाव विकासो सेक्रेटरी व शिपाई हे म्हणतात कि तुम्ही दिल्लीला जरी गेले तरी आमच काहीच करू शकत नाही कारण वरचे अधिकारी आमच्याच इशाऱ्यावर चालतात. साकेगाव विकासो व जे डीसीसी बँकेचे कर्ज वाटप अधिकारी कचरे यांनी संगमताने बोगस बागायत कर्ज वाटप केलेले आहे .
यांची चौकशी होवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी बोगस बागायत कर्ज बाबत आम्ही लोकेशन तारीख वेळे सहीत फोटो पुरावे म्हणून बँकेकडे सादर केलेले आहे तरी सुद्धा संबंधीतांना का पाठीशी घातले जात आहे वरीष्ठांनी या बाबतीत लक्ष घालावे व आम्हास न्याय दयावा अशी मागणी शेतकरी अशोक कुरकुरे यांनी केली आहे .

