Monday, March 23, 2026
Homeजळगावआमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त...

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

१४६ रुग्णांची तपासणी, ४५ जणांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           दि.२३
ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आजारांवर वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत, या सामाजिक जाणिवेतून आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावल येथे भव्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून एकूण १४६ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात ४५ रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया होणार आहे.

तपासणीदरम्यान मोतीबिंदूचा त्रास आढळलेल्या ४५ पात्र रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व रुग्णांना जळगाव येथे ने-आण करण्याची तसेच प्रवासासह इतर अनुषंगिक खर्चाची जबाबदारी आमदार अमोल जावळे यांनी घेतली आहे. निवड झालेल्या रुग्णांवर दि. २६ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी), जळगाव येथे पूर्णतः विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

जळगाव येथील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने रुग्णांची बारकाईने तपासणी केली. यामध्ये डॉ.विजय कुरकुरे, डॉ. तुषार सोनवणे आणि डॉ. अनंत लांडगे यांनी आपली मोलाची सेवा दिली. सोबतच शिवाजी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

“ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्यसेवा सहज आणि दर्जेदार पद्धतीने पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः डोळ्यांचे विकार, त्यातही मोतीबिंदू, वयोवृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. त्यामुळे रावेर परिसरात अशा आरोग्य शिबिरांद्वारे तपासणी आणि गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहील.” : आमदार अमोल जावळे

या प्रसंगी भाजपा गटनेता नंदा महाजन, नगरसेवक उमेश फेगडे, हेमराज हेगडे कल्पनाताई वाणी, रुबाब तडवी, योगेश चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष सागर कोळी, भरत पाटील, संदीप सोनवणे, विष्णू पारधे, वीर येवले, मुकेश कोळी, उज्वल कानडे. हेमंत चौधरी, डॉ. निलेश गडे, रितेश बारी, चेतन आढळकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या