सातपुड्याच्या जंगलात वन्यजीव वनविभागा तर्फे प्राण्यांसाठी ठीक ठिकाणी कृत्रिम पाणवठे
रावेर पाल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी पशुपक्ष्यांना मिळणार दिलासा:-वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी सरसावले पाल वन्यजीव वनविभाग
पाल ता रावेर दि २५/३/२०२६ सध्या जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत असून यामुळे जंगल परिसरातील जलस्रोत आटून राहिलेली आहे. यात एप्रिल आणि मे महिन्यात जंगल परिसरातील नदी, झरे , नैसर्गिक पानवटे पूर्णतः सुकलेले असतात यामुळे जंगलातील पशुपक्षी व वन्यप्राणी यांची पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते.
पिण्याच्या पाण्याची समस्येमुळे वन्य प्राण्यांची भटकंती होते. या समस्येमुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे वळण्याची भीती निर्माण होते. याची खबरदारी म्हणून जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी कृत्रिम पानवटे द्वारे पिण्याच्या पाण्याची पाल वन्यजीव वनक्षेत्रात एकूण ३८ कृत्रिम पानवटे आहेत.वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभाग सरसावले आहे.यावल वन्यजीव वन विभागातर्फे वनपरिक्षेत्रात कृत्रिम पानवट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.जणेकरून या कुत्रिम पानवठयामुळे वन्य प्राण्यांची पिण्याची पाण्याची समस्या दूर होऊन वन्यप्राणी मानवी लोकवस्तीकडे न जाता जंगल परिसरातच आपली तहान व उपजीविका भागवू शकेल.
वन्य प्राण्यांचे भटकंती थांबवावी, यासाठी वनपरिक्षेत्रांतर्गत कृत्रिम पाणवठे स्वच्छ करून पिण्याचे पाणी टँकरद्वारे भरले जात आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्यास पाणी मिळेल. वन विभागाचे कर्मचारी वेळोवेळी टँकरद्वारे हे पानवठे भरतात व त्यातील गाळ काढून ते स्वच्छ देखील करतात.


वनपपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष मार्गदर्शक सूचना वन विभागातील वनरक्षक, वनपाल, वनमजूर यांना वन्यजीव वनक्षेत्रपाल (पाल ) श्रीमती शीतल नगराळे यांच्या तर्फे देण्यात आल्या आहेत.
यावल वन्यजीव वनपरिक्षेत्रात बिबट, अस्वल, कोल्हा,वाघ,निलगाय,हरिण, सांबर, चौसिंगा,ससा, लांडगा,रानडूकर,जंगली मांजर हे वन्यप्राणी तसेच मोर, सुतार पक्षी,बगळा, बदक, होलगी, चिमणी,घार ,तितर ,पोपट, रान कोंबडी, बुलबुल,कावळा, कोतवाल अशा अनेक प्रकारचे वन्यप्राणी व पशुपक्ष्यांच्या सहवास या अभयारण्यात आहे. या सर्व पशुपक्षी व वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागातर्फे विशेष उपाय योजना करण्यात आलेल्या आहे.
*कोड :*जंगलात प्राण्यांना पाणी वेळेवर उपलब्ध करून दिल्यास ते मानवी वस्तीकडे वळणार नाही. यामुळे मानव व वन्यप्राणी संघर्ष कमी करता येईल.:- शितल नगराळे वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव पाल.)
*छायाचित्र:-* पाल ता रावेर सातपुड्याच्या जंगलात टँकर द्वारे कुत्रिम पानवठयात पाणी भरणारे टँकर.

