Saturday, April 4, 2026
Homeआंदोलनसेवालाल महाराज चौक उभारणीसाठी बंजारा समाजाचा ठिय्या आंदोलन; लवकर काम सुरू करण्याची...

सेवालाल महाराज चौक उभारणीसाठी बंजारा समाजाचा ठिय्या आंदोलन; लवकर काम सुरू करण्याची मागणी

सेवालाल महाराज चौक उभारणीसाठी बंजारा समाजाचा ठिय्या आंदोलन; लवकर काम सुरू करण्याची मागणी

चाळीसगाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               शहरातील घाट रोड, नारद चौफुली येथे संत सेवालाल महाराज चौक उभारणीच्या मागणीसाठी सकल बंजारा समाजाने बुधवार (दि. १ एप्रिल २०२६) रोजी चाळीसगाव नगरपरिषद मुख्यद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. दुपारी १२ ते २.३० या वेळेत झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.

 

Oplus_131072

समाजाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी संत सेवालाल महाराजांचे चौक/स्मारक उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात १९ सप्टेंबर २००४ रोजी आंदोलन व उपोषण करण्यात आले होते. त्यानंतरही वेळोवेळी स्मरणपत्र देत पाठपुरावा करण्यात आला आहे.दरम्यान, संबंधित चौक उभारणीसाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल समाज बांधवांनी आमदारांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त पुढील १५ दिवसांत भूमिपूजन होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने समाजात नाराजी व्यक्त होत आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, चौक उभारणीसाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून वर्क ऑर्डरही

 

Oplus_131072

निघाल्याची माहिती आहे. तरीही काम सुरू होण्यास विलंब का होत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.संत सेवालाल महाराजांचे स्मारक हे समाजाच्या श्रद्धा व अस्मितेचे प्रतीक असल्याने लवकरात लवकर काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा समाजातून तीव्र भावना व्यक्त होऊ शकतात व आंदोलन छेडण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी नगरसेवक घुष्णेश्वर पाटील, भिमराव जाधव, दिलीप पाटील यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. प्रभारी मुख्याधिकारी नेरकर यांनी निवेदन स्वीकारून याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या