Wednesday, November 18, 2026
Homeजळगावअंत्ययात्रा अडवून जातीवाचक शिवीगळ व धमकल्याप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी; मेहेतर समाज...

अंत्ययात्रा अडवून जातीवाचक शिवीगळ व धमकल्याप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी; मेहेतर समाज आक्रमक.

यावलमध्ये अंत्ययात्रा अडवून जातीवाचक शिवीगळ व धमकल्याप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी; मेहेतर समाज आक्रमक.

यावल  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – यावल शहरातील श्रीराम नगर येथील एका मेहेतर (अनुसूचित जाती) समाजातील महिलेच्या अंत्ययात्रेदरम्यान अडथळा निर्माण करून,अंत्ययात्रा थांबवण्यास भाग पाडत जातीवाचक अपमानकारक शिवीगळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी संबंधित दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्टसह (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९) भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कठोर कलमांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारा सविस्तर अर्ज यावल पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे.

काय घडली नेमकी घटना.?
प्राप्त माहितीनुसार १७ नोव्हेंबर २०२६ रोजी श्रीराम नगर यावल येथील स्वर्गीय कमलाबाई सुधाकर घारू यांचे निधन झाले. त्यानंतर बुधवार १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार वाजत-गाजत अंत्ययात्रा निघाल्या होत्या. ही अंत्ययात्रा यावल शहरातील नगीना परिसरातील मुख्य रस्त्यावर पोहोचली असता, मशिदीच्या ट्रस्टचे अध्यक्ष व सभासद व परिसरातील १० ते १५ जणांच्या समूहाने अंत्ययात्रा अडवली. तसेच, “वाद्य बंद करा, तरच पुढे जा” अशी धमकी देत अंत्ययात्रा पुढे जाऊ न देता वाद्य बंद करण्यास भाग पाडण्यात आले.

जातीवाचक अपशब्द व गंभीर आरोप 

यावेळी संबंधित व्यक्तींनी अत्यंत अपमानकारक वर्तन करत मेहेतर समाजाच्या भावना दुखावणारे जातिवाचक उद्गार काढले आणि मयत व्यक्तीच्या अंत्ययात्रेत सहभागी कुटुंबीय, नातेवाईक व समाजबांधवांना प्रचंड मानसिक त्रास,अपमान व भीतीचा सामना करावा लागल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.सार्वजनिक रस्त्यावरून कायदेशीर मार्गाने जाणाऱ्या अंत्ययात्रेला जातीय कारणावरून विरोध करणे अत्यंत गंभीर असून यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या कायद्यांतर्गत कारवाईची मागणी
याप्रकरणी तक्रारदार शितलकुमार युवराज घारू यांनी यावल पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या अर्जात खालीलप्रमाणे कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे:
अनुसूचित जाती व अनुसूचित जाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९:
कलम ३(१)(r): सार्वजनिक ठिकाणी अपमानित करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान किंवा धमकी देणे.
कलम ३(१)(s): सार्वजनिक ठिकाणी जातिवाचक नावाने शिवीगळ करणे.
कलम ३(१)(za)(A): सार्वजनिक रस्ता, मार्ग किंवा इतर समान सार्वजनिक सुविधांच्या वापरात अडथळा निर्माण करणे. भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS):
कलम १२६: बेकायदेशीररित्या मार्ग अडवणे.कलम ३५१: गुन्हेगारी धमकी.

पोलिसांना करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या 

अंत्ययात्रा अडवणाऱ्या संबंधित दोषी व्यक्तींवर तात्काळ FIR नोंदवून कठोर कारवाई करावी.
मशिदीचे ट्रस्टी, सभासद आणि प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेल्या १० ते १५ व्यक्तींची ओळख पटवून त्यांची नावे व भूमिका तपासावी.
घटना स्थथाळावरील मशिदीच्या परिसरातील दुकानदारांचे तसेच नगरपालिकेचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ ताब्यात घेण्यात यावे.
भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त व प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा वरिष्ठांकडे दाद मागण्यात येईल असा इशाराही समाजाकडून देण्यात आला आहे.

यावल शहरात धार्मिक स्थळाजवळ सार्वजनिक रस्त्यावर अंतयात्रा थांबविणे, विविध मिरवणूक काढल्या जातात त्या वेळेला वाजंत्री बंद करा अशी धमकी देणाऱ्या विरुद्ध आणि गोंधळ करणाऱ्या विरुद्ध म्हणजे ट्रस्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तरच असे प्रकार थांबतील अशी यावल शहरात चर्चा आहे.

यावलमध्ये अंत्ययात्रा आणि मिरवणुका रोखणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी. नागरिकांमध्ये तीव्र संताप.

यावल शहरातील सार्वजनिक रस्त्यांवरून जाणाऱ्या अंत्ययात्रा आणि विविध धार्मिक मिरवणुका धार्मिक स्थळाजवळ आल्यावर अडवून किव्वा अंतयात्रा जाताना वाजंत्री बंद पाडण्यासाठी धमकावण्याचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत.आज यावल शहरात असाच संतापजनक प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.सार्वजनिक रस्त्यावरील नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणत गोंधळ घालणाऱ्या संबंधित विश्वस्तांवर (ट्रस्टी) आणि समाजकंटकांवर पोलिसांनी तात्काळ कठोर गुन्हे दाखल करावेत,अशी जोरदार चर्चा आणि मागणी शहरभर होत आहे.कायद्याचा धाक दाखवून अशा प्रवृत्तींना वेळीच वेसण घातली, तरच शहरातील शांतता अबाधित राहील आणि असे प्रकार कायमचे थांबतील, अशी ठाम भूमिका यावलकरांनी घेतली आहे. या गंभीर घटनेची दखल घेऊन पोलीस प्रशासन आता काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.संबंधित अधिकाऱ्यांचा धाक राहिला नसल्याने तसेच काही ठराविक गटाची बाजू सांभाळणारे तैनात असल्याने त्यांची तत्काळ बदलीसुद्धा व्हायला पाहिजे अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या