Wednesday, November 18, 2026
Homeजळगावसहकार क्षेत्रातील विश्वासाला बिनविरोध विजयाची मोहोर!

सहकार क्षेत्रातील विश्वासाला बिनविरोध विजयाची मोहोर!

सहकार क्षेत्रातील विश्वासाला बिनविरोध विजयाची मोहोर!

भडगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पाचोरा सोसायटी मतदारसंघातून दादासो सुमित पाटील यांची, तर भडगाव सोसायटी मतदारसंघातून दादासो राहुल पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दोन्ही मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन मा जिल्हा परिषद सदस्य संजय श्रावण पाटील (भुरा आप्पा) यांनी सत्कार करत मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दोन्ही मान्यवरांच्या नेतृत्वातून सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळो, शेतकरी बांधवांच्या हितासाठी भरीव कार्य घडो आणि जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळो, हीच सदिच्छा!

याप्रसंगी समन्वय समितीचे अध्यक्ष आबासो युवराज पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ. विशाल पाटील, नगरसेवक रावसाहेब पाटील, खुमानसिंग हिलाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या