वाळू डंपर अपघात तपास एलसीबी कडे वर्ग करावा तसेच गिरणा नदीपात्रातून वाळू चोरी बंद करा अखिल भारतीय मराठा महासंघ
चाळीसगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी मेहुणबारा गुन्हा रजी नंबर77/2026 हा गुन्हा एलसीबी कडे वर्ग करावा तसेच वाळू चोरी बंद करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार व अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम यांच्याकडे करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की चाळीसगाव तालुक्यातील धुळे सोलापूर महामार्गावरील दसेगाव फाट्याजवळ 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता चंचल नामदेव लांडगे राहणार रहीपुरी व वैष्णवी वैभव चौधरी राहणार चाळीसगाव या दोन्ही विद्यार्थिनी स्कुटीने राहिपुरी जात असताना दसेगाव फाट्याजवळ भरधाव वेगाने वाळूच्या डंपर ने स्कुटीला जोराने धडक दिली डंपरच्या दनक्याने दोन्ही विद्यार्थी जोराने रस्त्यावर फेकल्या गेल्या त्यात जबर मार लागल्याने चंचल नामदेव लांडगे हिचा जागीच मृत्यू झाला वैष्णवी वैभव चौधरी हिची प्रकृती चिंताजनक आहे संतप्त ग्रामस्थ घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते व महामार्ग ग्रामस्थांनी रोखून ठेवला होता संतप्त ग्रामस्थांचा गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतुकीबाबत रोष दिसून आला अखिल भारतीय मराठा ने निवेदनात अशी मागणी केली आहे की, सदरचा गुन्हा एलसीबी कडे वर्ग करावा डंपर मालक व वाळू चोरी करण्यास मदत करणाऱ्याला अशा सर्वांना सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे तसेच गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी बंद करावी निवेदनाची दाखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील धनंजय मराठे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील तालुका उपाध्यक्ष प्रशांत पाटील अमोल पाटील तालुका संघटक शेखर पाटील युवक तालुका उपाध्यक्ष रोहित बोरसे शहर कार्याध्यक्ष सिद्धांत पाटील सोमनाथ केदार स्वप्निल जाधव राहुल कदम प्रमोद गुंजाळ वाल्मीक शेलार जगन्नाथ भवर किरण भवर चेतन गुंजा गुंजाळ सतीश कदम सुनील पाटील अनिल चव्हाण योगेश घुमरे संदीप कोळकर रामकृष्ण पाचोरे आदीच्या साह्या आहेत.


