Friday, April 3, 2026
Homeगुन्हाभुसावळात श्रीराम नगरात गावठी कट्ट्यासह तरुणाला अटक

भुसावळात श्रीराम नगरात गावठी कट्ट्यासह तरुणाला अटक

भुसावळात श्रीराम नगरात गावठी कट्ट्यासह तरुणाला अटक

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी
भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी गावठी पिस्टल व जिवंत काडतुस घेऊन फिरणाऱ्या संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई २ एप्रिल रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संदिप सुनील जाधव (वय २३, रा. कुमावत नगर, सहजयश अपार्टमेंट, प्लॉट क्र. ३०३, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) हा श्रीराम

 

मंदिराजवळील रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. त्याच्याकडून गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा सुमारे २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचेही उघड झाले आहे. भूषण संजय चौधरी यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या