Friday, April 3, 2026
Homeगुन्हाभुसावळ शहरात गावठी पिस्तुलसह आरोपी ताब्यात !

भुसावळ शहरात गावठी पिस्तुलसह आरोपी ताब्यात !

भुसावळ शहरात गावठी पिस्तुलसह आरोपी ताब्यात!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी. बी. पथकाने श्रीराम नगर भागातील गुप्त माहितीच्या आधारे गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.मा. पोलीस अधिक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते, तसेच उप विभागीय पोलीस अधीकारी भुसावळ भाग श्री. केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भुसावळ शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले.
गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागातील श्रीराम मंदीर जवळ संदीप सुनिल जाधव (वय 23, रा. कुमावत नगर, सहजयश अपार्टमेंट, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) हा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तुल (लोखंडी) बाळगून आला होता. डी. बी. पथकाने पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती केली.त्याच्याकडून 20,000 रुपये किंमतीची गावठी पिस्तुल मॅगझीनसह, 1,000 रुपये किंमतीचे एक जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. आरोपीविरुद्ध गु.र.नं. 162/2026 आर्म्स अॅक्ट 3/25 आणि म.पो.का. कलम 37, 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर तपास उप विभागीय पोलीस अधीकारी भुसावळ भाग श्री. केदार बारबोले व पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. 2692 विजय बळिराम नेरकर करीत आहेत.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या