भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला; आरोपी ताब्यात

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी. बी. पथकाने फक्त दोन दिवसांत 5,70,000 रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रुपये चोरलेल्या आरोपीला ताब्यात घेतला आहे.
दिनांक 30 मार्च 2026 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला वसीम अहमद अब्दुल बासीद शेख रा. फातेमा कॉलनी, भुसावळ यांनी घरफोडीची तक्रार केली. त्यांची फिर्याद अशी होती की, 28 ते 30 मार्च दरम्यान ते घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने घर फोडून 5,70,000 रुपये किमतीचा सोन्याचांदीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरली.

पोलीस अधिक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधीकारी भुसावळ भाग केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने त्वरित कारवाई करत आरोपीचा शोध घेतला.
गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलीसांनी अमीर खान हबीब खान (वय 35, रा. न्युईदगा जवळ, भुसावळ) याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने या घरफोडीमध्ये एका विधी संघर्ष बालकाशी सहकार्य केले असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 4,99,100 रुपये किमतीचा चोरी केलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.
सदर आरोपीला न्यायालयाने 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिला असून, पुढील तपास उप विभागीय पोलीस अधीकारी भुसावळ भाग केदार बारबोले व पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप निरीक्षक राजु सांगळे करत आहेत.

