Saturday, April 4, 2026
Homeनोकरीभुसावळात मोठी कारवाई! महानिर्मितीच्या अधिकाऱ्याला निलंबनाचा धक्का

भुसावळात मोठी कारवाई! महानिर्मितीच्या अधिकाऱ्याला निलंबनाचा धक्का

भुसावळात मोठी कारवाई! महानिर्मितीच्या अधिकाऱ्याला निलंबनाचा धक्का

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – आर्थिक अनियमितता, नियमबाह्य खरेदी आणि प्रशासकीय गैरव्यवहारांच्या गंभीर आरोपांमुळे महानिर्मितीने भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील कार्यकारी अभियंता उमेश रघुनाथ ढोक यांना तात्काळ निलंबित केले आहे. या कारवाईमुळे ऊर्जा विभागात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष समितीच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एकाच आयटम कोडचा वेगवेगळ्या कामांसाठी वापर, बजेट नियमांचे उल्लंघन, वर्क ऑर्डरचे विभाजन, तसेच पूर्वमंजुरी न घेता खरेदी केल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नाही, तर एकाच बोलीदारांना वारंवार संधी दिल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.पेमेंट प्रक्रियेतही मोठ्या त्रुटी आढळल्या. केवळ प्रमाणपत्रांवर आधारित कोट्यवधींची देयके दिल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकाराच्या अर्जांना प्रतिसाद देण्यात टाळाटाळ केल्यामुळे संशय अधिक गडद झाला.
ऊर्जामंत्री सचिवालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात ढोक यांना दर सोमवारी खापरखेडा येथे हजेरी लावावी लागणार आहे.महानिर्मितीने स्पष्ट केले की, ही कारवाई पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी करण्यात आली असून, पुढील काळात अशा प्रकरणांवर आणखी कठोर पावले उचलली जातील.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या