Thursday, January 29, 2026
Homeभुसावळदिपनगर प्रकल्पातील स्थानिक कंत्राटदारांना ८०% कामे मिळणे अपेक्षीत : दीपक हातोले !

दिपनगर प्रकल्पातील स्थानिक कंत्राटदारांना ८०% कामे मिळणे अपेक्षीत : दीपक हातोले !

दिपनगर प्रकल्पातील स्थानिक कंत्राटदारांना ८०% कामे मिळणे अपेक्षीत : दीपक हातोले

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दिपनगर औष्णिक वीद्युत निर्मिती प्रकल्पात स्थानिक कंत्राटदारांना ऐंशी टक्के कामे मिळणे अपेक्षीत आहे. आणि त्यासाठी आमची संघटना प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन बीटीपीएस कंत्राटदार असोसिएशन चे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक हातोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
यावेळी बीटीपीएस कंत्राटदार असोसिएशन ची स्थापना करण्यात आले असून अध्यक्षपदी दीपक हातोले, उपाध्यक्ष विनोद पाठक, सचिव फिरोज पठाण, सहसचिव विजय तायडे, कायदेशीर सल्लागार महेंद्र पाटील,संघटक अमोल इंगळे , प्रसिद्ध प्रमुख भावेश चौधरी, दीपक वाढे,तर सदस्य म्हणून , महेंद्र सरकटे,विशाल पाटील, विष्णू तायडे,शेख अनस, प्रदिप माळी, आदी पदाधिकारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे सचिव फिरोज पठाण यांनी संघटनेच्या माध्यमातून स्थानिक कंत्राटदारांना जास्तीत कामे मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तसेच लवकरच लिमिटेड चौकशी सुरू करण्या करिता प्रशासना कडे मागणी केली जाईल. असे देखील त्यांनी सांगितले.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या