भुसावळ तालुक्यात भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस उत्साहात साजरा होणार
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिवसानिमित्त भुसावळ तालुका पूर्वमध्ये विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि ६ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता वरणगाव येथील भाजपा कार्यालयात होणार आहे. यावेळी दिवंगत नेते नारायण दादा पाटील, सुधीर कोल्हे व इतर मान्यवर नेत्यांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात येणार असून, त्यांना अभिवादन करण्यात येईल.यानंतर सकाळी १० वाजता तिरंगा सर्कल, वरणगाव येथे भाजपा ध्वजारोहणाचा सोहळा पार पडणार आहे. तसेच पक्षासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
दुपारी ४ वाजता नामदार संजय सावकारे यांच्या कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पक्षाच्या आगामी वाटचालीवर चर्चा होणार असून, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.कार्यक्रम प्रमुख अजय रमेश पाटील, तालुकाध्यक्ष प्रशांत प्रभाकर पाटील, सरचिटणीस तुषार पाटील, विजय तायडे तसेच शहराध्यक्ष पप्पू माळी यांनी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.