संविधान चषकाचे उद्घाटन संपन्न…
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – दीपनगर येथील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सवानिमित्त दिनांक 01/04/ 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता प्रभारी मुख्य अभियंता राजेश कुंभार साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कुंभार साहेबांनी उपस्थित सर्व खेळाडूना शुभेछा दिल्या व जयंती निमित्त सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले… कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणुन उपमुख्य अभियंता वैशाली पाटील मॅडम अधिक्षक अभियंता संजय पखान , विजय पांढरपट्टे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जाधव कार्यकारी अभियंता महेश तांबे , गोविंद मुंडे, उमेश निंबाळकर, महेश पगवाड श्रीकांत कोंडार ,मिलींद खंडारे व्यासपीठावर उपस्थित होते… यंदा हे संविधान चषक आयपीएल स्पर्धे प्रमाणे खेळवले जात असुन याला उदंड असा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.. दीपनगर सुपर किंग्स विरुद्ध दीपनगर इंडियन्स यांच्या मधे खेळवला गेला सर्व खेळाडूंनी लाईन उप करुन सर्व मान्यवरांकडून शुभेच्छा स्वीकारल्या…
याप्रसंगी क्रिकेट समितीचे मनोज जमदाडे, विजय वाघ , प्रशांत वाघ आशुतोष लांबोळे, विनोद भिरुड, , दत्तात्रय शिंदे गगन पाली ,बंडु मेकाले ,विनायक बोराटे ,रवी पाटील तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोषाध्यक्ष रोशन वाघ, मोहित कांबळे , छगन पवार स्वप्नील जाधव , पद्माकर बाऱ्हे, रोशन बाऱ्हे मनोहर बाऱ्हे,निलेश पिंगळे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक बोराटे यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंती उत्सव समिती सचिव नितीन सोनवणे यांनी मानले….