“माजी विद्यार्थ्यांचा एक दिवस शाळेसाठी”; डिजिटल शिक्षणाचे धडे
संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपक्र I जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे “माजी विद्यार्थ्यांचा एक दिवस शाळेसाठी – डिजिटल शिक्षण मार्गदर्शन” हा उपक्रम पार पडला. प्रारंभी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांना कु. लीना माळी हिने विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. मोबाईल व इंटरनेटचा योग्य व सुरक्षित वापर कसा करावा, ऑनलाईन शिक्षणासाठी विविध साधनांचा उपयोग कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रात्यक्षिक सत्रामध्ये , विविध शैक्षणिक ॲप्सचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रश्न विचारले व शंका निरसन करून घेतले. कार्यक्रमाला माजी विद्यार्थी मुकेश महाजन, चेतन सपकाळे, मयूर घोडेराव, कार्तिक चौधरी, गिरीश दांडगे, अंश जोहरे आवर्जून उपस्थित होते . शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक ठरला.

