पोदार इंटरनॅशनल स्कूलची लक्षवेधी यशाची परंपरा कायम.


इयत्ता दहावीचा १००% निकाल.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१६ तापी नदीच्या किनारालगत तथा यावल भुसावळ रोडला लागून असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कूल इयत्ता दहावी (CBSE) चा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने आपल्या उत्तुंग यशाची लक्षवेधी परंपरा यंदाही मोठ्या अभिमानाने कायम राखली आहे.
या वर्षी सानिका चौधरी ९८.४ %, हिने प्रथम क्र.पटकावला, तर सोहम चव्हाण – ९८.०० %, द्वितीय आणि गिरीराज बऱ्हाटे – ९७.८%, तृतीय क्रमांकावर राहिले.तसेच पुढील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले –
पार्थ पाटील – ९७.६%, गोकर्ण महाजन – ९७.४%, शर्वरी अंबुस्कर – ९७.२%, ट्विंकल निकम – ९७.००%, कौस्तुभ राठोड – ९६.६% , गुनरीत कौर बल – ९६.४%, आयुषी काबरा – ९६.०%, स्वर नाझीरकर – ९४.८%, स्तवन निमजे – ९४.६%, रुजूल पाटील – ९४.६%, सौम्य उत्तमचंदानी – ९४.४%, जान्हवी चौधरी – ९४.२%, सुमेध गोले – ९४.०%, उत्कर्ष पाटील – ९३.८%, सर्वज्ञ झाल्टे – ९३.६%, श्रेया सस्कर – ९३.६%, कुर्वेश सपकाळे – ९३.४%, जान्हवी देवांगन – ९३.२%, जान्हवी किरंगे – ९३.०%, मान्या पटेल – ९३.०%, ओम तायडे – ९३.०%, गार्गी सूरकर – ९२.८%, अदिती केदारे – ९२.८%, हर्षित लोया – ९१.६%, आस्था अहुजा – ९१.४%, युग सिंग – ९१.०%, रुद्रनिल अडसुले – ९१.०%, कृष्णा कूरीर – ९०.२%, श्रुतकिर्ती उम्रीवाड – ९०.२%, अवनी कोल्हे – ९०.०% या निकालाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सुमारे ८०% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ७५% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तसेच ३३ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक गुण मिळवले असून, मराठी, इंग्रजी व संगणक विषयांमध्ये १३ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष कामगिरी केली आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन,पालकांच्या सहकार्याचा मोठा वाटा आहे.
शाळेचे प्राचार्य सचिन बनसोडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच उपप्राचार्या रेखा मुळे,व्यवस्थापक रामदास कुलकर्णी,मुख्याध्यापिका मनीषा श्रुंगी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्राचार्यांचा विद्यार्थ्यांसाठी संदेश –
तुमच्या अथक परिश्रम, जिद्द आणि सातत्यामुळे तुम्ही आज हे यश संपादन केले आहे. हा निकाल तुमच्या मेहनतीचा खरा सन्मान आहे.
यश मिळाल्यावर नम्रराहा आणि पुढील वाटचालीत अधिक मोठी उद्दिष्टे ठेवा.प्रत्येक टप्प्यावर शिकत राहा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवा अशा उज्ज्वल भविष्यासाठी पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सचिन बनसोडे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

