Tuesday, June 23, 2026
Homeजळगावडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना भाजपातर्फे अभिवादन

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना भाजपातर्फे अभिवादन

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना भाजपातर्फे अभिवादन

 

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरातर्फे जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, अखंड भारताचे पुरस्कर्ते तथा भारतरत्न डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 73 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

भुसावळ शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे असलेल्या त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 

यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य प्रमोदभाऊ सावकारे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे, गटनेते युवराज लोणारी, शहराध्यक्ष (उत्तर) संदीप सुरवाडे, शहराध्यक्ष (दक्षिण) किरण कोलते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वारके, सरचिटणीस पवन बुंदेल, अमोल महाजन, जयंत माहुरकर, सागर चौधरी, नगरसेवक गिरीश महाजन, विशाल नाटकर, बोधराज चौधरी, डॉ. प्रसाद बोंडे, पुरुषोत्तम नारखेडे, प्रमोद नेमाडे, गुणवंत बोरोले, मुकेश पाटील, राजेंद्र नाटकर, श्रेयस इंगळे, उदय पाटील, योगेंद्र हरणे, नंदकिशोर बडगुजर, गोपीसिंग राजपूत, महिला आघाडीच्या शैलजाताई पाटील, नगरसेविका प्राची पाटील तसेच वृषभ राजपूत, राजू खरारे, संजय बोचरे, कैलास शेलोडे, गजू भारंबे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांचा व कार्याचा गौरव केला. तसेच “भारत माता की जय”, “डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अमर रहे” आणि “वंदे मातरम्” अशा घोषणांनी देत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या