सायगाव येथे कृषीदूत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे देणार धडे

पाचोरा : खानदेश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे धुळ्यातील शासकीय कृषी महाविद्यालयामधील अंतिम वर्षातील विद्यार्थी ‘रावे’ अभ्यासक्रमांतर्गत कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव योजनेच्या माध्यमातून कृषीदूत म्हणून दाखल झाले आहेत.
कृषीदूतांनी सर्वप्रथम गावाचे सर्वेक्षण केले. त्यानंतर रांगोळीच्या माध्यमातून सायगावचा सुंदर नकाशा साकारला. या वेळी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कृषीदूतांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत माती व पाणी परीक्षण, पीक पद्धती, योग्य वाणांची निवड, खत व्यवस्थापन, कीड
GPS
व रोग व्यवस्थापन तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्व त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. कृषीदूत म्हणून सुशांत हलकुडे, स्वप्निल गवळी, ऋषिकेश देसले, सोहम देवरे, कुणाल पाटील, आकाश चव्हाण व नयन पाटील या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत चर्चा केली. या उपक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. एम. इल्हे, कार्यक्रम समन्वयक डॉ. जे. एच. गायकवाड, केंद्रप्रमुख डॉ. एस. सी. वाडीले, अधिष्ठाता प्रतिनिधी प्रा. नितीन घोडके व कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. के. माळी यांचे मार्गदर्शन लाभले.

