भा.ज.पा.यावल शहराध्यक्षपदी कोण.? राजकारणात उत्सुकता.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२६
भारतीय जनता पार्टीचे यावल शहराध्यक्षपद रिक्त असल्याने शहराध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे संपूर्ण यावलकरांसह राजकारणाला उत्सुकता लागली असून पक्षात आतापर्यंत ज्यांनी मोलाचे सहकार्य आणि योगदान दिले आहे त्यांना संधी मिळणार की सत्तेचा लाभ घेण्यासाठी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना संधी दिली जाणार.? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.
भाजपाने आतापर्यंत यावल शहराध्यक्षपद अनेकांना दिले होते आणि आहे परंतु पक्षनिष्ठा आणि ध्येय उद्दिष्ट काहींनी आपल्या सोयीनुसार अमलात आणल्यामुळे पक्षाला पाहिजे त्याप्रमाणे नगरपालिका निवडणुकीत मिळालेली मतदानाची संख्या लक्षात घेता भाजपाच्या अपेक्षेप्रमाणे पाहिजे त्या प्रमाणात लाभ मिळाला नाही.पक्षात नेहमी सक्रिय असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून शहराध्यक्षपदाची नियुक्ती करायला पाहिजे अशी राजकारणात चर्चा असते परंतु भाजपा पुन्हा मर्यादित काम करणारे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना महत्व न देणाऱ्या आणि शहरातील सर्व स्तरातील नागरिकांना विश्वासात घेऊन काम न करणाऱ्या आणि नागरिकांच्या संपर्कात न राहता फक्त शासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून अधिकाऱ्यांकडून आर्थिक कामे करून घेणाऱ्यांना संधी देणार का.? किंवा पक्षाच्या ध्येय उद्दिष्टानुसार वागणारे व्यंकटेश बारी,रितेश बारी,भूषण फेगडे इत्यादी बऱ्याच कट्टर समर्थक कार्यकर्त्यांपैकी भाजपा शहराध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करणार आहेत किंवा नाही .? किव्वा आमदार अमोल भाऊ जावळे खासदार रक्षाताई खडसे यांचे यावल शहरातील समर्थक निलेश गडे यांना पुन्हा संधी देणार आहेत का.? किंवा भाजपात राजकीय दृष्टिकोनातून लाभ घेण्यासाठी प्रवेश करणाऱ्यांपैकी कोणाला संधी दिली जाणार आहे का.? याकडे संपूर्ण यावल शहरासह तालुक्यातील राजकारणाचे लक्ष लागून आहे.

