तालुक्यात गळफास घेऊन एकाची आत्महत्या तर दुसरा उष्माघाताचा बळी.?

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२६
यावल तालुक्यात पाडळसे येथील जगदीश आत्माराम कुंभार वय ३८ याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून मिळाली.तर पिळोदा शेत शिवारात १ व्यक्ती उष्माघाताने मरण पावल्याची चर्चा आहे परंतु याबाबत अद्याप शासन दरबारी नोंद नसल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे.
दोन्ही घटना आज रविवार दि.२६ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या असताना शासन दरबारी अधिकृत नोंद नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

