पशुधनाचे आरोग्य चांगले तर आपले आरोग्य चांगले राहील : हिरालाल चौधरी.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.४
पशुधन हे शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे, पशुधनाचे आरोग्य चांगले तर आपले आरोग्य चांगले राहील. लंपी आजारामुळे गुरढोरांमुळे शेतकऱ्यांची बरेच आर्थिक नुकसान झाले होते, पशुधनावर वेळेवर उपचार होण्यासाठी अत्याधुनिक पशुवैद्यकीय दवाखाना आवश्यक असल्याची माहिती भाजपा प्रदेश सदस्य हिरालाल चौधरी यांनी दिली.
येथील सातोद रोडवरील स्टेट बँक समोर पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन भाजपाचे प्रदेश सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावल – रावेर विधानसभा मतदार संघाचे शिल्पकार सर्वांचे लाडके
आमदार अमोलदादा जावळे यांच्या प्रयत्नांनी मंजुर स्थानिक विकास निधीमधुन यावल येथे पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारत बांधकाम या विकास कामाचे भूमिपूजन सोहळा आयोजित केला होता परंतु आमदार जावळे यांना आपल्या पक्षाचे महत्त्वाचे काम निघाल्याने त्यांच्या ऐवजी प्रदेश सदस्य हिरालालभाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारतीचे बांधकाम भूमिपूजन करण्यात आले.

पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारतीचे नूतनीकरण बांधकाम भूमिपूजन होत असल्याने अद्यावत अशी पशुवैद्यकीय लॅब, पशुवैद्यकीय क्लिनिक,गोठ्याची व्यवस्था,अशा सुविधा पूर्णत्वास येणार असल्याने शेतकऱ्यांना आपले पशुधन चांगल्या प्रकारे सांभाळता येईल आणि यासाठी भविष्यात जागा रिक्त राहू नये म्हणून शासनाकडून पशुवैद्यकीय दवाखान्यात आवश्यक त्या पदाची भरती सुद्धा केली जाईल अशी माहिती डॉ. कुंदन फेगडे यांनी दिली.
भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सागर कोळी,उमेश फेगडे,प्रभाकर सोनवणे,पी.एस. सोनवणे सर,राकेश कोलते,रुबाब तडवी,मुकेश कोळी,चेतन आढळकर,वेंकटेश बारी,नितीन सोनार,दरबारसिंग पाटील,सविता भालेराव, जयश्री चौधरी,योगेश चौधरी,जितू पाटील,कोमल इंगळे,भरत पाटील,अनिल पाटील, उज्वल कानडे,नरेंद्र चौधरी, विकास चौधरी,निलेश पाटील, विलास चौधरी,यांच्यासह शक्तीकेंद्र प्रमुख,बुथ प्रमुख इत्यादी पदाधिकारी,कार्यकर्ते,शेतकरी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

