दारु पिवून त्रास देणाऱ्या पतीचा गळा आवळून निघृण खून

जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारु पिवून वारंवार त्रास देणाऱ्या भरत नामदेव पाटील (वय ५८, रा. केसीपार्क) या प्रौढाचा पत्नीने गळा आवळून निघृण खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अकस्मात मृत्यूवरुन शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मयताच्या संशयीत पत्नी मनिषा भरत पाटील (वय ४५) यांची चौकशी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील कानळदा रोडवरील केसी पार्क परिसरात भरत पाटील हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते. त्यांची पत्नी शहरातील एका कापड दुकानात कामाला होती तर दोघ मुल एमआयडीसीतील कंपनीत कामाला होती. भरत पाटील यांना दारूचे व्यसन असल्यामुळे ते कर्जबाजारी देखील होते. त्यामुळे घरातील संपुर्ण जबाबदारी ही मनिषा पाटील यांच्यावर होती. भरत पाटील हे दारुच्या नशेत दररोज पत्नीसह मुलांना त्रास देत होते. मंगळवारी रात्री ९ वाजता मनिषा पाटील या कामावरुन घरी परतल्या. त्यावेळी त्यांचे पती दारुच्या नशेत घराच्या ओट्यावर बसलेले होते. डोक्यात जबर मार लागल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने भरत पाटील यांच्या कानातून आणि नाकातून रक्त निघाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यावेळी परिसरातील एका तरुणाने भरत पाटील यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.डॉक्टरांसह पोलिसांनी मयत भरत पाटील यांच्या शरिराची पाहणी केल्यानंतर त्यांच्या मानेवर गळा आवळल्याचे वज्र दिसून आल्यामुळे पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानंतर बुधवारी दुपारच्या सुमारास भरत पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालावरुन भरत पाटील यांचा मृत्यू गळा आवळल्यमुळे श्वास गुदमरुन झाल्याचे निष्पन्न झाले.
कामावरुन आलेल्या पत्नीसोबत दारुच्या नशेत असलेल्या भरत पाटील यांनी वाद घातला. त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाल आणि संतापाच्या भरात मनिषा पाटील यांनी पती भरत पाटील यांचा दोरीच्या सहाय्यान गळा आवळला. गळा आवळल्यानंतर भरत पाटील हे पलंगावरुन खाली कोसळल्यान त्यांच्या डोक्याला दुखापत होवून अंतर्गत रक्तस्त्रास झाला.भरत पाटील यांचा पलंगावरुन पडून नव्हे तर गळा आवळून मृत्यू झाल्याचे निष्पन्न होताच, पोलिसांनी संशयित मनिषा पाटील यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी दारुच्या आहारी गेलेल्या पतीकडून वारंवार त्रास दिला जात होता. त्याला कंटाळून संतापाच्या भरात गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्यानंतर याप्रकरणी अकस्मातस मृत्यूच्या नोंदीवरुन खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मनिषा पाटील यांची चौकशी करण्यात आली.

