बदलापूर येथील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने राज्यात पुकारलेला बंद मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतर हा बंद मागे घेण्याची घोषणा ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, नेत्यांनी घेतला असला तरी यावल येथे यावल – भुसावळ मार्गावरील टी पॉईंटवर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्ग अवलंबून वाहतुकीस रहदारीस कोणताही अडथळा निर्माण न करता काळ्या फिती बांधून आंदोलन केले.आंदोलनात संपूर्ण महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले.